सोलापूर प्रतिनिधी वैभव यादव

सोलापूरात विमानसेवा नसल्याने नागरिकांच्या मनात प्रचंड नाराजी
_सोलापूरकरांच्या भावना तीव्र असल्याचे जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे सोलापूर विकास मंचने केले अवगत_

सोलापूर विकास मंच, वेकअप सोलापूर फौंडेशनचे, गिरिकर्णिका फाऊंडेशन आणि सोलापूरच्या सगळ्या प्रमुख संघटना आणि प्रतिष्ठीत व्यक्तींच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून अभ्यासपूर्ण आणि सनदशीर मार्गाने होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूरकरांच्या तीव्र भावना सर्व संबंधित यंत्रणां पर्यंत पोहोचवल्या आहेत. होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा नसल्याने सोलापूरकरांचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आसूनही होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू न करता फक्त व्ही.आय.पी. व्यक्तींसाठीच हे विमानतळ सुरू असल्याने सोलापूरकरांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी लोकसभेत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या उडान योजने संदर्भात आजतागायत कोणत्याही प्रकारचा अभ्यासपूर्ण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिदित्य सिंदिया यांना अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामा विषयी दिरंगाई करा बद्दलचे पत्र दिले आणि सोलापूरच्या प्रशासाकीय यंत्रणे मध्ये त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे सोलापूरच्या जनतेला निदर्शनास आले आहे. २०१४ सालापासून सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सोलापूर महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्ष आणि चुकांमुळे होटगीरोड विमानतळास प्रमुख अडथळा असलेली श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी आजतागायत जिवघेणे प्रदुषण करत उभी आहे, २०१४ सालीच सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांची कामगिरी चोख निभावली असती तर आज सोलापूरकरांना हे भोग भोगण्याची वेळ आली नसती असे सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. 

जोवर सर्वसामान्य सोलापूरकरांसाठी नागरी विमानसेवा सुरू होत नाही तोवर सोलापूराचे होटगी रोड विमानतळ हे बंद ठेवण्यासाठी सोलापूरचे सामान्य जनता, प्रमुख सामाजिक संस्था आणि व्यक्ती हे सोलापूरकरांच्या वतीने शुक्रवार दिनांक २२ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ठिक ०५:०० वाजता होटगी रोड विमानतळाला प्रतिकात्मक कुलुप लावणार होते, सदर नाराजीची रितसर परवानगी सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालया यांना मागणी केली होती. प्रशासकीय परवानगी मिळाली नसल्याने आणि कायदा सुव्यवस्थेचे आचरणकर्ते नागरिक ह्या नात्याने सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या वतीने दोन वेळा मंजूर झालेल्या उडान योजने अंतर्गत नागरी विमानसेवा सर्वसामान्य सोलापूरकरांसाठी तात्काळ सुरू करण्या विषयीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द  केले. ह्यावेळी वेकअप सोलापूर फौंडेशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले, आनंद पाटील, गिरिकर्णिका फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव,  योगीन गुर्जर, श्रीनिवास वैद्य, केतन शहा, सुहास भोसले, डॉ. सुभाष वैकुंठे, प्रतिक खंडागळे, शहाजहान आत्तर, कीसन रिकीबे, जयश्री तासगावकर, दत्ता अंबुरे, मनोज क्षीरसागर तथा सोलापूर विकास मंचचे सदस्य आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog