बाभूळगांवच्या वेताळबाबा यात्रेला सुरुवात.....

  पारंपारिक पद्धतीने साजरी होणार. ....सोमनाथ जावळे .

 इंदापूर प्रतिनिधी : धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
   
   ‌ कोरोनामुळे सलग दोन वर्ष खंडित झालेली यात्रा पुन्हा पारंपरिक पद्धतीने साजरी होणार आहे.  दि २७/०४/२०२२ रोजी गावचे देवस्थान वेताळ बाबा यात्रेला सुरूवात होत आहे .  यात्रेनिमित्त बुधवारी संध्याकाळी आठ वाजता पारंपरिक गुलालाची उधळण करत लेझीम पथक, ढोलपथकाच्या निनादात छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.
  यात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन या ठिकाणी पहावयास मिळते वेताळबाबांचे मुख्य पुजारी बबन शेख आणि परिवाराला पूजेचा मान आहे. 
   दि. २८/०४/२०२२ रोजी सकाळी विविध कलाकारांच्या तसेच वेषभूषा कलाकारांच्या हजेरीचा पारंपारिक कार्यक्रम सकाळी नऊ ते आकरा या वेळेत होणार आहे.  
    दुपारी तीन वाजता भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानावर राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवर कुस्ती खेळाणारे नमंकित मल्ल तसेच आंतरराष्ट्रीय मल्ल यांच्यात विषेश लढती होणार आहेत. या मैदानात स्वर्गीय शिवाजी आण्णा जावळे यांचे स्मुर्तीप्रित्यार्थ मा. सोमनाथ जावळे यांचे वतीने माऊली कोकाटे विरुद्ध अली (इराण), मा.संजय देवकर यांचे वतीने महारुद्र काळेल विरूद्ध इब्राही (इराण) संतोष जगताप विरुद्ध भरत लोहकरे, सुभाष डरंगे (पवार) यांच्या वतीने सचिन केचे विरूध्द अनिल जाधव,  जमीर मुलाणी विरूद्ध मेघराज शिंदे,  वृषिकेश भांडे विरुद्ध विजय सौदागर अशा राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय मल्लांच्या निकाली लढती हनुमान मंदिर परिसरातील मैदानावर होणार आहेत. या वेळी ऐन वेळी खेळावल्या जाणाऱ्या कुस्त्यांची नोंदणी सकाळी अकरा ते दोन पर्यंत केली जाणार आहे. 
   दि ३०/०४/२०२२ रोजी सायंकाळी नऊ वाजता मनोरंजनाचा 'रंगबहार आँर्केस्ट्रा' च्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होणार आहे . अशी माहिती गावकर्‍यांच्या वतीने सरपंच प्रतिनिधी सोमनाथ जावळे यांनी दिली.



चौकट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शोभयात्रा.....
   बाभूळगांवात  दि २८ रोजी संध्याकाळी आठ वाजता डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभयात्रा काढण्यात येणार आहे आशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कमीटीचे अध्यक्ष नितीन मिसाळ यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog