बावडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत हर्षवर्धन पाटील सहभागी .....
 इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी...

      बावडा येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती मिरवणूकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी ( दि.29) विनम्र अभिवादन केले. यावेळी हर्षवर्धन पाटील हे काही वेळ मिरवणुकीमध्ये चालत सहभागी झाले. यावेळी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयुरसिंह पाटील, विकास पाटील, सरपंच किरण पाटील, उपसरपंच निलेश घोगरे, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________
फोटो :- बावडा येथे जयंती मिरवणुकीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिकृतीस पुष्पहार अर्पण करताना भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील.

Comments

Popular posts from this blog