गोतोंडी सोसायटीवर भाजपचे कमळ पूर्ण फुलले.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल...
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विजयी उमेदवारांना दिल्या पुढील वाटचालीसाठीच्या शुभेच्छा.....
भाजप प्रणीत गोतोंडी विविध सोसायटीवर गौतमेश्वर विकास पॅनलने सर्वच्या सर्व 13 -0 असा विजय मिळवीत यश संपादन केले आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गावपातळीवरील विकासामध्ये विविध कार्यकारी सोसायटी यांचे स्थान मोठे असून विजयी सदस्यांनी विकासात्मक कार्याला महत्त्व द्यावे असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
Comments
Post a Comment