राष्ट्रीय समाज पक्षाचे एडवोकेट संजय माने यांचा इंदापुरात भव्य सत्कार.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
इंदापुर मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी भक्कम, कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप.....
आज इंदापूर येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष एडवोकेट श्री संजय माने यांनी इंदापुर मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष बांधणीसाठी अचानक भेट दिली असता त्यांना भेटीदरम्यान इंदापूर तालुका हा राष्ट्रीय समाज पक्षाची बांधणी ही मजबूत होत आहे असे त्यांना दिसून आले, यावेळी इंदापूर राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष एडवोकेट संजय माने यांचा सत्कार पक्षाच्या कला-क्रीडा आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष किरण राऊत सर यांच्या हस्ते इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे करण्यात आला ,यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोपने, जिल्हा उपाध्यक्ष, सतीश शिंगाडे ,नवनाथ कोळेकर, सोन्या जानकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना एडवोकेट संजय माने म्हणाले सर्व सामान्य समाजाचे प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय समाज पक्ष आहे .आगामी काळात पक्षाची ध्येयधोरणे जानकर साहेबांचे विचार प्रत्येक घरा घरा पर्यंत पोचविण्याचे काम कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आगामी काळात करणार आहे. इंदापूर तालुक्यामध्ये पक्ष्यांची वाढ चांगले असून आणखीन व्यवस्थित नियोजन केल्यास इंदापूर मधून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खाते उघडू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Comments
Post a Comment