आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तब्येतीची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली विचारपूस.....
भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बाणेर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच त्यांच्या कुटुंबासमवेत संवाद साधून त्यांना धीर दिला.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच ते बरे होतील, लवकर बरे व्हावेत यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना अशी प्रतिक्रिया माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
Comments
Post a Comment