मामा निवडून यावे म्हणून केला होता नवस,......
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
निंबोडी, तालुका इंदापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त श्री दत्तात्रय मामा भरणे राज्यमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर हे आले असताना त्यांना श्री दिपक पंढरीनाथ खाडे व श्री रुपेश शिवाजी घंबरे. यांच्याकडून माहिती मिळाली की निंबोडी गावातील सर्वसामान्य व्यक्ती श्री राजेंद्र सुभेदार चव्हाण यांचा श्री मारुतीरायाच्या चरणी असा नवस होता की, जो पर्यंत मामा निवडून येत नाहीत तो पर्यंत व मामा निवडून आल्यानंतर मामांच्या हातून मारुतीरायाच्या चरणी नारळाचे तोरण बांधत नाही,तो पर्यंत मंदिरांमध्ये पाय ठेवणार नाही,असा त्यांचा नवस होता ही माहिती मिळताच मामांनी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या गाड्यांचा ताफा मारुतीरायाच्या मंदिराकडे वळवला वश्री राजेंद्र सुभेदार चव्हाण यांचा नवस सन्माननीय मामांनी मारुतीरायाच्या चरणी नारळाचे तोरण वाहून पूर्ण केला.
Comments
Post a Comment