मंगलवाडी येथे भूमिपुत्र शाखा स्थापना व सर्कल मेळावा संपन्न
रिसोड प्रतिनिधी / उकंडी ढेंबरे
भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने मंगलवाडी तालुका रिसोड येथे शाखा स्थापना व सर्कल सभेचे आयोजन दि. 28 एप्रिलला करण्यात आले होते. सभेचे अध्यक्ष म्हणून मंगलवाडी येथिल कास्तकार नेताजी पाटील वाळके हे होते तर उद्घाटक म्हणून भूमिपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूमिपुत्र चे राज्य संघटक डाॅ.जितेंद्र गवळी, भूमिपुत्र जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, हिंगोली कार्याध्यक्ष शंकरराव देशमुख यांनी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे महत्त्व व कार्य विषद केले. विचार व्यक्त करतांना संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी शेतकरी एकोपा आणि शेतकऱ्यांनी आपले प्रश्न आणि आडचनी बाबत स्वतः बोलेले पाहिजे व वेळ प्रसंगी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहीजे, तरच व्यवस्था शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल आसे म्हणाले. मंगलवाडी स्टॅन्ड वर रघुनाथ पौळ व त्यांच्या सहकार्यानी उभ्या केलेल्या आकर्षक भूमिपुत्र शाखा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आयोजकनी भूमिपुत्र च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फेटे बांधुन फटाक्याच्या आतषबाजीत स्वागत केले. कार्यक्रमासाठी शंकरराव मुंढे, रविंद्र चोपडे,श्रीरंग नागरे, संतोष सुर्वे, सचिन काकडे, रिसोड शहर अध्यक्ष विकास झुंगरे, गजानन जाधव, डाॅ.अमर दहीहंडे, भागवत मामा, सखारामजी टकले, पंढरी नरवाडे, गजानन काकडे, गोरखनाथ पाचरणे, पंजाब नरवाडे, दिपक सरोदे, विकास पाटील, रवि जाधव, सीताराम लोखंडे, संतोष गव्हाणे, कैलास पाटील इंगोले अध्यक्ष से.सो. शंकरराव हुबांड, मोहजा इंगोले, अर्जुनराव तुरूकमाने,पवन खोंडकर,शंकर गिर्हे, गणेश नागरे, रजनिष खोंडकर याच्या सह तालुक्यातील भुमिपुत्र चे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीराम वाळके यांनी केले तर आभार गणेश मोरे यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन रघुनाथ पौळ, गणेश मोरे, योगेश वाळके अनिरुद्ध पौळ सह रूद्र शंभुराजे मित्र मंडळ व मंगलवाडी गावकर्यांनी केले होते.
Comments
Post a Comment