होटगी येथील विमान सेवा सुरू करण्यात यावी.....
अनेक संघटनांचे धरणे आंदोलन
सोलापूर प्रतिनिधी.. वैभव यादव माय मराठी न्यूज चॅनल....
आज सोलापुर मध्ये सोलापुर विचार मंच, सोलापुर विकास महासंघ , वेक अप सोलापुर फौडेशंन, गिरीकर्णिका फौडेशंन ,सेव्ह सोलापुर यांच्या सहकार्याने वतीने होटगीरोड येथुन विमानसेवा सुरू करावी यासाठी फार मोठ्या पद्धतीने धरणे आंदोलन करण्यात आले जवळपास शहरातील सर्व प्रसिद्ध उद्योजक, व्यापारी संघटना, व्यवसायिक संघटना, समाजसेवा संघटना यांनी पाठिंबा दर्शविला व सहभाग नोंदवला आहे.
आजचे आंदोलन वैशिष्ट्य म्हणजे रोज ४४ डिग्री तापमान असताना आज मात्र मेघांनी व निसर्गानी या आंदोलनास भरघोस पाठिंबा देऊन तापमान अत्यंत सकारात्मक ठेवण्याची जबाबदारी घेतली होती, तसेच आंदोलनास सर्वच स्तरावरून पाठिंबा मिळाला यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये या आंदोलन च्या शिष्टमंडळ चे निवेदन घेण्यास कोणताही अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये उपस्थित नव्हते. सदर बझार पोलीस स्टेशन चे कर्तव्य दक्ष अधिकारी यांनी लक्ष घातल्याने तेवढे तरी एक अधिकारी उपस्थित राहून निवेदन स्वीकारले ही फार मोठी प्रशासनाची गंभीर चुक आहे. जनतेच्या आंदोलनास जर प्रशासन एवढ्या हलक्यावर घेत असेल व निवेदंनास कचरा चा कागद समजत असेल . तर ही लोकशाही साठी फारच मोठी चिंतेची बाब म्हणून पुढील काळात नक्कीच सिद्ध होईल.
आंदोलनास मिळालेला पाठिंबा पाहता सोलापुरात आता जनतेनेच पुढाकार घेऊन कार्य सिद्धीस न्यावे लागेल हे आजच्या आंदोलनातुन आधोरिकेत व सिद्ध झाले आहे.
Comments
Post a Comment