हर्षवर्धन पाटील यांचेकडून रमजान ईद, अक्षय तृतीया व बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा
     - आनंदाचा त्रिवेणी संगम ..... हर्षवर्धन पाटील.
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल ...

      रमजान ईद, अक्षय तृतीया व बसवेश्वर जयंती निमित्त भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. एका दिवशी हे उत्सव आल्याने आनंदाचा त्रिवेणी संगम झाला आहे. देशातील नागरिक हे एकमेकांच्या धार्मिक सणांचा मनःपूर्वक आदर करतात, सर्व सण मानवी जीवनाला बंधुत्व आणि शांततेची शिकवण देतात, असे गौरवोद्गार शुभेच्छा देताना हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
            रमजान ईद हा आनंदाचा सण आहे. मोहम्मद पैगंबरांनी आपल्या जीवनकाळात संपुर्ण मानवजातीला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली.  संपुर्ण मानवजातीच्या कल्याणा करीता आपले आयुष्य वाहुन घेतले. त्यांनी मानवजातीचा सन्मान, शांती, समता, बंधुता, सुरक्षित व विकासाचा मार्ग दाखवून दिला असे गौरवोद्गार काढून हर्षवर्धन पाटील यांनी मुस्लिम बंधू-भगिनींना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
          अक्षय तृतीया सण हिंदू समाजातील पावन पर्व मानले जाते. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे. हिंदू समाज हा सण मोठ्या आनंदात व उत्साहाने साजरा करतो. हा दिवस ज्ञान परंपरेचा सुवर्णयुग मानला जातो, असे गौरवोद्गार काढून हर्षवर्धन पटेल यांनी अक्षय तृतीयेच्या हिंदू समाजातील बंधू-भगिनींना शुभेच्छा व्यक्त केल्या.
       महात्मा बसवेश्वर यांनी मानवी जीवनाला नवी दिशा दिली. त्यांचा भर हा माणूस घडविण्यावर होता. महात्मा बसवेश्वर यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अध्यात्म, तत्त्वज्ञान, शिक्षण साहित्य अशा विविध क्षेत्रात क्रांतिकारी विचारांची पेरणी केली, असे नमूद करून हर्षवर्धन पाटील यांनी महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले

Comments

Popular posts from this blog