ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत.....    
      शरद जामदार

.इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....

 ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी केली.
 शरद जामदार म्हणाले की,'राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने इंदापूर तालुक्यामध्ये भिगवन व इंदापूर येथे ओबीसीसमाजाला राजकीय आरक्षण मिळावे यासाठी दोन आंदोलन केली होती. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी भारतीय जनता पक्षाची ठाम भूमिका आहे.
   येणाऱ्या काळात दोन तृतियांश निवडणुका होणार आहेत. या निवडणुका पार पडल्या तर ओबीसींना कधीच आरक्षण मिळणार नाही. आरक्षण नसेल तर ओबीसींना न्याय मिळणार नाही. आरक्षण नसेल तर ओबीसींनी प्रतिनिधीत्व मिळणार नाही.
     माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवले होते.महा विकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्यांना न्यायालयात हे आरक्षण टिकविता आले नाही हे दिसून येते. इम्पीरियल डाटा साठी योग्य ती पावले उचलली नाहीत उलट त्यांची त्यांनी दिशाभूल केली आहे. भारतीय जनता पक्ष ओबीसी राजकीय आरक्षणाच्या पाठीशी आहे.

Comments

Popular posts from this blog