इंदापूर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा 93.40टक्के निकाल तर कला शाखेचा 69.46%निकाल.......
इंदापूर तालुका प्रतिनिधी.... धनश्री गवळी माय मराठी न्यूज....
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचा इयत्ता बारावीचा ऑनलाइन निकाल नुकताच लागला असून यामध्ये इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य तसेच व्यवसायिक शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेमध्ये मोठे यश संपादन केले आहे.
संस्थेचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले , सचिव मुकुंद शहा,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जीवन सरवदे आणि उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
बारावी कला शाखेमध्ये प्रथम क्रमांक कु. येळे वैष्णवी दादासाहेब 86.00, द्वितीय क्रमांक कु. शेंडगे वैष्णवी तात्याराम 85.67, तृतीय क्रमांक शिंदे निखिल बबन 80.50, वाणिज्य शाखेमध्ये प्रथम क्रमांक कु. मोहिते तेजल रामहरी 82.67, द्वितीय क्रमांक कु. भोंग सिद्धी सुरेश 80.33 तृतीय क्रमांक कुलकर्णी रोहन राहुल 80.00, व्यवसाय शिक्षण विभाग (MCVC)प्रथम क्रमांक कु.सोनवणे काजल किशोर 67.33,द्वितीय क्रमांक कु. क्षिरसागर वैष्णवी बाबासाहेब 62.66,तृतीय क्रमांक विभागून कु. जळकोटे कावेरी हनुमंत 62.50 आणि दरदरे पुनीत साहेबराव 62.50
कोरोना कालखंडानंतर प्रथमच ऑफलाइन पद्धतीने या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी योग्य प्रयत्न करून हे यश संपादन केले.
Comments
Post a Comment