पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्याच्या अनुषंगाने मंदिर व सभा स्थळाची पाहणी......

  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली पाहणी ....

इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....

    पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगद्गुरु श्री. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देहू येथे 14 जून रोजी येणार असून त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश आण्णा टिळेकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, आमदार राहुल कुल, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, आचार्य तुषार भोसले, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त, सोहळा प्रमुख, अधिकारी व पदाधिकारी यांनी आज मंदिर परिसर, सभा स्थळ व हेलिपॅडची पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला.
     वारकरी संप्रदायासाठी हा ऐतिहासिक क्षण असून 50 हजारापेक्षा जास्त वारकरी या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत त्या अनुषंगाने आज पाहणी व नियोजनाचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog