बावडा पोलिसांची धडक कारवाई
इंदापूर तालुका प्रतिनिधी....माय मराठी न्यूज चॅनल.....
इंदापूर पोलिस स्टेशन अंकित बावडा दूरक्षेत्र हद्दीतील मौजा रेडनी, नीरा नरसिंगपूर ,गिरवी ,गणेश वाडी ,या ठिकाणी देशी-विदेशी व गावठी हातभट्टी दारू विकत आहेत, अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे माननीय पोलीस निरीक्षक मुजावर साहेब साहेब यांच्या आदेशाने रवाना होऊन इसम नामे.. सुभाष वामन चव्हाण, नागेश संजय चव्हाण, अजय संभाजी चव्हाण, जयवंत नामदेव हाके,वरील चारही राहणार रेडणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तसेच सयाजी महादेव घोगरे राहणार गणेशवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तसेच तानाजी जनार्धन भंडलकर राहणार गिरवी, तालुका इंदापूर जिल्हा पुणे व गणेश सहदेव शिंदे राहणार नीरा नरसिंगपूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे वरील सर्व इसम बेकायदेशीर अवैधरित्या देशी विदेशी तसेच पिण्याच्या पाण्याच्या जार मध्ये व प्लास्टिक ड्रम मधील हातभट्टी गावठी दारू विक्री करणाऱ्या इसमावरती प्रोहिबिशन रेड करून एकूण 15860 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीस ताब्यात घेऊन बावडा दूरक्षेत्र येथे यांच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई माननीय डॉक्टर अभिनव देशमुख साहेब पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, माननीय मिलिंद मोहिते अप्पर पोलीस निरीक्षक बारामती विभाग, माननीय गणेश इंगळे पोलीस उपाधीक्षक बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर , सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, सहाय्यक फौजदार शिंदे, महिला पोलीस हवालदार खंडागळे, पोलीस नाईक कदम, गायकवाड, कळसाईत, पोलीस शिपाई राखुंडे, विशाल चौधर, व बारामती आ सी पी पथक सहाय्यक फौजदार तोंडे व त्यांचा स्टाफ यांनी मी मिळून ही कारवाई केली.
Comments
Post a Comment