दत्तात्रय दडस यांची मुख्याध्यापक पदी निवड.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल ....
राधिका माध्यमिक विद्यालय इंदापूर येथील माध्यमिक विद्यालयातील मधील शिक्षक श्री दत्तात्रय दडस सर यांची मुख्याध्याप पदी निवड करण्यात आली आहे. या अगोदरचे मुख्याध्यापक भोंगाने सर सेवानिवृत्त झाले आहेत. भोंगाने सर यांच्या सेवानिवृत्तीनंतर याच विद्यालयाचे हुशार व अभ्यासू शिक्षक श्री दत्तात्रय दडस सर यांची संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अरविंद (तात्या ) विष्णू वाघ यांनी दडस सरांची निवड करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे खजिनदार माननीय श्री राजेंद्रजी जगन्नाथ जगताप तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय श्री अंकुश आप्पा पाडुळे तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रमोद राऊत तसेच विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना नुतन मुख्याध्यापक यांनी असे सांगितले की राधिका माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तसेच संस्थेच्या सदस्यांनी माझ्यावर जी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी दिली ती जबाबदारी मी नक्की यशस्वीरित्या पार करीन असे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment