माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आईचे निधन.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल...

महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या मातोश्री गिरीजाबाई उर्फ जि.जि. विठोबा भरणे यांचं शुक्रवार दिनांक एक जुलै रोजी वृद्धापकाळाने  निधन झाले आहे‌ मागील काही दिवसापासून त्यांच्या वर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
आज दुपारी दोन वाजता भरणेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कैलासवासी गिरीजाबाई विठोबा भरणे या इंदापूर तालुक्यामध्ये जि.जि नावाने प्रसिद्ध झाल्या होत्या, त्या अत्यंत मायाळू व प्रेमळ स्वभावाच्या होत्या, इंदापूर शहरामध्ये लोक त्याचा खूप आदराने सन्मान करत होते. गावातील कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची उपस्थिती अवश्य होती. दत्तात्रय भरणे यांच्या कुटुंबावर आज फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कैलासवासी गिरीजाबाई विठोबा भरणे यांच्या पश्चात रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे, मधुकर भरणे, दत्तात्रय भरणे ,ही चार मुले व चार सुना तीन मुली नातवंडे असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog