नवीन सरकार महाराष्ट्र राज्यासह, सर्वसामान्य जनतेच्या चौफेर  विकासासाठी कटिबद्ध....

हर्षवर्धन पाटील
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....

  महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन.

   यावेळी मा. श्री. हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राज्यात अनैसर्गिक पद्धतीने सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार आता राहिलेले नाही. सर्वसामान्य जनतेचा या आघाडी सरकारला चेहरा नसल्याने नियतीने या सरकारला पायउतार होण्यास भाग पाडले. 
         नूतन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे नवीन सरकार राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी सत्तेवर आले असून त्यामुळे राज्याच्या विकासासाठी व सर्वसामान्य, गरजू, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बरोजगारांसाठी काम करेल. तसेच माझ्या इंदापूर तालुक्याचा विकास देखील गती मिळेल.  देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमितजी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राला अधिक बळकटी देण्याकरिता मा.एकनाथजी शिंदे व  मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे असलेल्या राजकीय व प्रशासकीय अनुभवातून ते महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे कार्य करतील यात कोणतीही शंका नाही. आपल्या महाराष्ट्र राज्यासह इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. पुनश्च एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन.

Comments

Popular posts from this blog