मित्रत्वाच्या स्नेहाची आणि बालपणीच्या आठवणीनी तब्बल ३५वर्षानी भरलेला दहावीचा वर्ग ....
इंदापूर तालुका प्रतिनिधी....
धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
सन १९८६-८७ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रयत शिक्षण संस्थेचे सौ कस्तुराबाई श्रीपती कदम हायस्कूल मध्ये पार पडला.
या स्नेह मेळाव्यास निमित्त होते.... ते या रयत विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या दौंड पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक श्री समीर शेख यांच्या वाढदिवसाचे त्यांचा वाढदिवस साजरा करणे . तसेच इयत्ता दहावी मधील माजी विद्यार्थी संमेलनाचे नियोजिन केले. गुरुजनांना कार्यक्रमाची माहिती देऊन गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी गुरुजनांना आवश्यक उपस्थित राहण्यासाठी विनंती केली. पावसाची रिमझिम आणि आनंदी, उत्साही वातावरणात विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उपस्थिती लावली होती.
सदर गुरूपौर्णिमे निमित्त पी.के पाटीलसर, बारकुंडे सर,वनवे सर, पी.आर.जाधवसर गाडेकर मॅडम,चोरमले मॅडम, जाधव मॅडम या गुरुजनांचे औक्षण करून संपूर्ण पोशाख भेट देवून विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा साजरी केली.याप्रसंगी या विद्यालयातील कार्यरत असणारे मुख्याध्यापक श्री.भास्कर वाबळे सर,पर्यवेक्षक श्री विजय शिंदे सर ,सुनील मोहीते सर,श्री.नीलकंठ शिंदे सर,कैलास राऊत यांचा सन्मान करण्यात आला.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूरचे सुपुत्र व शाळेचे माजी विद्यार्थी , आर टि ओ प्रकाश खटावकर यांना अध्यक्ष स्थान स्वीकारण्याबाबत श्री बाळू मखरे यांनी विनंती केली आणि श्री अशोक चिंचकर यांनी त्यास सर्वांच्या वतीने अनुमती दिली. सुरुवातीला उपस्थित गुरुजन व मान्यवरांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन कले त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भास्कर वाबळे सर यांनी स्वागत गीत सादर केली त्यानंतर पुढील कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी विद्यार्थीनी अनिता भुजबळ, बानू बागवान, वंदना लावंड, संध्या शेवाळे,नौशाद शेख,वंदना गलांडे,आनंदी गलांडे, संगिता भिसे,राणी बोडके,कल्पना शिंदे,सविता बर्गे,योगिता खटावकर ,सविता राऊत आदी उपस्थित होते. ....... यावेळी श्री.पाटीलसर,श्री.वनवेसर, श्री.बारकुंड सर,सौ.चोरमले मॅडम,सौ. गाडेकर मॅडम, विद्यार्थी तांबवे, विनायक वाघमारे,नगरसेवक कैलास कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.प्रकाश खटावकर होते..... प्रा.बाळासाहेब मखरे यांनी सूत्र संचालन केले. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन केलेल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी यांचे सर्वांच्या वतीने दादासाहेब देवकर,अरूण राऊत यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment