इंदापुर तालुक्यातील १४, तलावात पाणी सोडले जाणार ........
  माजी, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे....

इंदापूर तालुका प्रतिनिधी....
धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....
इंदापूर तालुक्यातील 14 तलावात पाणी सोडले जाणार 
आहे,अशी माहिती माजी, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
 या संदर्भात श्री भरणे यांनी अधीक्षक अभियंता संजीव चोपडे खडकवासला कालव्याला इंदापूर साठी पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली होती यानंतर श्री आमदार भरणे यांचे सूचनेवरून श्री चोपडे यांनी खडकवासला प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना सूचना देत  खडकवासलाद्वारे इंदापुरातील पाझर तलाव भरण्याच्या सूचना दिल्या आहेत .
यानुसार आज पासून इंदापुर तालुक्यातील तलाव भरण्यासाठी खडकवासलाद्वारे पाणी सोडण्यात आले आहे हे पाणी इंदापूर तालुक्यात येथे चार दिवसात पोचणार आहे. त्यानंतर तालुक्यातील तलावात पाणी सोडले जाणार आहे . सध्या राज्याच्या काही भागात जरी मुसळधार पाऊस सुरु असला तरीही इंदापुर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस नाही . इंदापुर तालुक्याच्या एका बाजुला निरा तर दुसऱ्या बाजुला भिमा नदी आहे . या दोन्ही नदयाच्या मधल्या भागांमधील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी मदनवाडी ते तरंगवाडी दरम्यान १४ पाझर तलावांची निर्मिती केली आहे . हे तलावांमध्ये खडकवासला कालव्याच्या माध्यमतुन पाणी सोडण्यात येते . 
खडकवासला प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनासाठी व  तलाव भरण्यासाठी पाणी सोडले जाणार आहे .
 सध्या इंदापूर तालुक्यामध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही, त्यामुळे विहिरी आणि कुपनलिका यांच्या पाणी पातळी येथेही वाढ झालेली नाही याशिवाय तलाव ही कोरडे आहेत तसेच शेतकऱ्यांनी उसाच्या लागणी  सुरू केल्या आहेत. या उसाच्या लागण्यांना सध्या मुबलक पाण्याची गरज आहे. याशिवाय शेतकऱ्यांची शेततळी देखील सध्या कोरडी आहेत. शेतकऱ्यांना  रब्बी व उन्हाळी आवर्तनात शेततळ्यामध्ये पाणी भरता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनाही आवर्तनाद्वारे अपेक्षित पाणी   भरता येणार आहेत  .

Comments

Popular posts from this blog