कडबनवाडी येथील दुर्घटनाग्रस्त विमानाची अंकिता पाटील ठाकरे यांनी केली पाहणी.......

इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....

     इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे विमान कोसळून महिला पायलट जखमी झाली असल्याची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्माच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी कडबनवाडीला भेट देत दुर्घटनाग्रस्त विमानाची पाहणी केली.
    हे विमान शेतात कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. शिकाऊ विमानाच्या सहाय्याने कसरत करत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळले. अपघातग्रस्त महिला पायलट यांना तात्काळ प्रथम उपचारासाठी श्री.माऊली (काका) चवरे यांनी जवळच्या दवाखान्यामध्ये घेऊन गेले.

Comments

Popular posts from this blog