सोलापूरकरांच्या केलेल्या अपमानाची पी.शिवशंकर यांनी मागावी बिनशर्त विनम्रतेपूर्वक माफी.......
सोलापूर शहर प्रतिनिधी...वैभव यादव,माय मराठी न्यूज चॅनल....
अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामा विषयी अनास्थेमुळे सो.म.पा. आयुक्त यांच्या विरोधात सोलापूरकरांचा तीव्र रोष**
सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी पाडकामा विषयी अनास्था दाखवत असल्याने आयुक्तांच्या विरोधात सर्वसामान्य सोलापूरकरांचा रोष दिसून येत आहे. दिनांक : २० जुलै २०२२ रोजी सोलापूरातील एका प्रसिद्ध दैनिका मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमी मध्ये पी.शिवशंकर म्हणाले की, "सोलापूर विकास मंच एकाच मुद्द्यावर चर्चा करत आहे, त्यांना दुसरे काम नाही". आयुक्तांच्या वतीने बोलवण्यात आलेले हे वाक्य अत्यंत बेजबाबदार, निंदनीय, आणि क्लेशदायक असून त्यांच्या ह्या वक्तव्यामुळे सर्व प्रमाणिक करदाते सोलापूरकरांना त्यांनी अपमानित केले असून त्याचा सोलापूरकरांच्या मनात पी.शिवशंकर यांच्या विषयी तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सोलापूर विकास मंचच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरच्या विकासाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केला जात असून, होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठी सोलापूरकरांच्या तीव्र भावना प्रशासना पर्यंत वेळोवेळी सोलापूर विकास मंचच्या पोहण्यात आल्या आहेत. आज बुधवार दिनांक २७ जुलै रोजी सकाळी ११:०० वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या चिमणी पाडकामाविषयीच्या दुटप्पी भुमिके विरोधात चार पुतळा ते महानगरपालिका निषेध मोर्चा आणि महानगरपालिकेच्या गेट समोर अत्यंत तीव्र आणि भव्य स्वरूपाचे आंदोलन, ज्यात सोलापूरातील नामांकित संस्था, संघटना आणि व्यक्ती यांचा जाहीर पाठिंबा आणि शेकडोंच्या संख्येने सामान्य सोलापुरकरांची व्यक्तीगत उपस्थिती राहणार होती पण पोलीस प्रशासनाच्या वतीने सदर परवानगी नाकारण्यात आल्याने आंदोलन संस्थिगित करण्याचा निर्णय सोलापूर विकास मंचच्या वतीने घेण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी बाबत सुनावणी अपेक्षित होते. आयुक्तांच्या वतीने डि.जी.सी.ए.च्या सुनावणीचा सबब सांगून सदर सुनावणी दुसर्यांदा श्री.सिध्देश्वर सह साखर कारखाना व्यवस्थापां समवेत चर्चा करून त्यांच्या मनमानी पद्धतीने त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुढिल तारिख दिली. हाच न्याय पी.शिवशंकर बाकी कोणाचेही म्हणणे न ऐकता थेट कारवाईचा बडगा उचलत गरिब निराधार लोकांचे घर पाडुन त्यांना बेघर करतात तथा छोटे व्यवसायिकांचे खोके ताब्यात घेऊन महानगरपालिकेच्या आवारात तोडफोड करुन गंज खाण्यासाठी ठेवता.
सोलापूर विकास मंचच्या विरोधात म्हणजेच सोलापूरच्या जनतेच्या विरोधात आयुक्तांच्या वतीने आणि सो.म.पा.चे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांनी सोलापूर विकास मंचच्या पदाधिकाऱ्यां सोलापूर महानगरपालिकेत निवेदन देण्यासाठी प्रत्यक्ष गेल्यावर सर्व सदस्यांना असंस्कृत आणि असंवेदनशील भाषेत आमच्या विरोधात बेजबाबदारीचे विधान केले. आम्ही सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी.शिवशंकर ह्यांना निवेदनाद्वारे मागणी करतो केली की, प्रमाणिक करदात्यांचा जो अपमान केला आहे त्याचा पी.शिवशंकर यांनी सोलापूरकरांची तात्काळ बिनशर्त विनम्रतेपूर्वक माफी मागावी.
०९ अॉगस्ट रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूरात नियोजित दौरा निश्चित असून त्यांच्या समवेत अनेक केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रतिष्ठित उद्योजक तथा अन्य मोठे व्हि.व्हि.आय.पी. अतिथी ह्यांच्या विमानांना चिमणीचा अडथळा असल्याचे निवेदन सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूरच्या जिल्हा प्रशासन तथा सोलापूर महानगरपालिकेला वारंवार कळवुनही त्यांच्या वतीने सदर प्रकरणात कोणतेही गांभीर्य नसल्याचे सोलापूरकरांच्या निदर्शनास आले आहे.
सोलापूरच्या विकास होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा नसल्याने सोलापूरकरांचे व्यापारी, शेतकरी तथा सोलापूर महानगरपालिकेचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले असून सोलापूर महानगरपालिकेच्या चालढकल वृत्तीच्या निषेधार्थ सोलापूराच्या नागरींकांमध्ये प्रचंड रोष असून त्याचा परिणाम जनतेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येत आहे, येणाऱ्या काळात ह्या आंदोलनाची तीव्रता आणखी उग्र होण्याचा शक्यता नाकारता येत नाही असे सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी आयुक्तांना ठासून सांगितले. सोलापूरच्या विकासात प्रमुख अडथळा असलेली तथा सोलापूरकरांच्या आरोग्यास अत्यंत धोकादायक अश्या श्री.सिध्देश्वर सह साखर कारखान्याची को जनरेशनची अनाधिकृत बेकायदेशीर चिमणी तात्काळ पाडण्या विषयीचे निवेदन आयुक्त पी.शिवशंकर यांना देण्यात आले. ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अनंत कुलकर्णी, आनंद पाटील, अॅड.प्रमोद शहा,गणेश पेनगोंडा, प्रतिक खंडागळे, अर्जुन रामगिर आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment