माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले भरणे कुटुंबियांचे सांत्वन 

इंदापूर :प्रतिनिधी दि. 2/7/22

     भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व कुटुंबीयांचे भरणेवाडी येथे आज शनिवारी ( दि.2) सांत्वन केले. दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे वृद्धपकाळाने शुक्रवारी निधन झाले.
        भरणे कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी हर्षवर्धन पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी गिरीजाबाई भरणे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मधुकर भरणे, रामचंद्र भरणे, आबासाहेब भरणे व भरणे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
______________________
फोटो :- भरणेवाडी येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व कुटुंबियांचे सांत्वन केले.

Comments

Popular posts from this blog