माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कदम कुटुंबीयांचे केले सांत्वन......
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....

आज काटी येथील कदम कुटुंबाचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे कडून सांत्वन करण्यात आले.
   काटी येथील तृप्ती नानासाहेब कदम या १२ वर्षीय शाळकरी मुलीचा खडी वाहतूक करत असलेल्या एका हायवा ट्रक खाली चिरडून दुर्दैवी निधन झाल्याची घटना २९ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास काटी वडापुरी रस्त्यानजीक घडली. रस्ते अपघातामुळे शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याने कदम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ,यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काटी येथील कदम कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेतली व सांत्वन केले.

Comments

Popular posts from this blog