चला करुया आरोग्याची वारी ........
इंदापूर तालुका प्रतिनिधी.... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल...
जगतगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आज इंदापूर पतंजलि योग समिती,युवा भारत इंदापूरच्या सर्व योग साधकांनी पहाटे उपस्थित राहुन चला करूयात आरोग्याची वारी, याअंतर्गत योगशिबीर घेतले.वैष्णवांच्या या योगशिबीरामध्ये सुमारे १५० लोकांनी प्रत्यक्ष कृतीतुन व १०० पेक्षा अधिक लोकांनी श्रवण करून योगप्राणायमाचा लाभ घेतला यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.
यावेळी सचिन पवार आणि प्रशांत गिड्डे ,बिभिषण खबाले यांनी सुर्यनमस्कार ,आसने प्राणायम, अँक्युप्रेशर याची प्रात्यक्षिके घेतली.
तसेच आयुर्वेदाचार्य मल्हारी घाडगे, आणि रविंद्र परबत यांनी आयुर्वेदीक औषधांचे महत्व व विविध आयुर्वेदीक वनस्पती दाखवुन त्याचा प्रत्यक्ष काढा कसा बनवायचा सेवन कधी व कसे करायचे रोगानुसार आयुर्वेद याविषयी उपयुक्त सुंदर माहीती सांगितली.
स्वदेशी प्रचारासाठी दृष्टी आयड्राॅप उपस्थित सर्व वारकर्यांच्या डोळ्यामध्ये टाकण्यात आला आणि त्याचे महत्व सांगीतले.
चंद्रकांत देवकर नानांच्या विडंबन कवितेला दाद देत सर्वांच्या चेहर्यावर मनापासुन हास्य आले..
श्री विकास खिल्लारे यांनी 0nline फेसबुकच्या माध्यमातुन कार्यक्रमाचे थेटप्रेक्षपन केले.
यावेळी शरद झोळ, रामेश्वर साठे,देविदास सारंगकर, शंकर काशिद माऊली मोरे बाजीराव शिंदे, देवराव मते,पियुष बोरा ,भालचंद्र भोसले, देवराव मते, ज्ञानु डोंगरे,राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.
Comments
Post a Comment