कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस व कोव्हॅक्सिन,कोवी शिल्ड लसीचे मोफत वितरण.......
कर्मयोगी चे संचालक शांतीनाथ शिंदे पाटील यांनी घेतला बुस्टर डोस .....
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....
आज अवसरी येथील श्री हनुमान विद्यालय अवसरी मध्ये बूस्टर डोस
कोवॅक्सिंन कोवीशिल्ड, या कोरोना लसीचे मोफत वाटप प्राथमिक आरोग्य केंद्र सुरवड यांच्यामार्फत करण्यात आले. राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच फ्रंट लाईन वर्कर यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस मोफत देण्यात आले. दोन डोस घेतलेल्या नागरिकांनी तसेच फ्रंटलाईन वर्कर यांनी बूस्टर डोस कडे पाठ फिरवली होती परंतु सुरवड केंद्र अंतर्गत या लसीचे वितरण करण्यात आले कोरोना प्रतिबंधक लस 15 जुलैपासून बुस्टर डोस मोफत दिला जाईल ती घोषणाही केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र सुरवड येथील आरोग्य सेविका ,कल्पना बुधावले व आरोग्य सेवक बाबासाहेब मोरे यांच्या मदतीने अवसरी येथे 55 लसीचे मोफत वितरण केले. यावेळी हायस्कूल मधील विद्यार्थी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी,यांनी तसेच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतीनाथ शिंदे पाटील यांनीही बुस्टर डोस घेऊन नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचे आव्हान केले.
Comments
Post a Comment