75,भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्धापन दिन समारंभ कार्यक्रम आनदात साजरा....
आमदार दत्तात्रय भरणे.

  इंदापूर तालुका प्रतिनिधी.... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....

 पंचायत समिती इंदापूर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री आवास योजनेतील डेमो हाऊसचे उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळी पंचायत समिती आवारामध्ये वृक्षारोपण  केले याप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पंचायत समिती सभागृहामध्ये महा आवास अभियान अंतर्गत विहित कालावधीमध्ये घरकुले पूर्ण केल्याबद्दल 75 लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ व प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले तसेच जयश्री नरके या शिक्षिका जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिगवन यांच्या भाषणातून भविष्य या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत तालुकास्तरावर /जिल्हास्तरावर घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे बक्षीस वितरण याप्रसंगी अशा अशा विविध कार्यक्रमाप्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे यांनी मार्गदर्शनावेळी इंदापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांना लागेल तो निधी देण्याची व इंदापूर तालुक्यातील गरजूंना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याबद्दल कटिबद्ध असल्याची माहिती दिली यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच पंचायत समिती इंदापूरचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट ,डॉ राम शिंदे तसेच सर्व विभाग प्रमुख पंचायत पंचायत समिती मधील अधिकारी कर्मचारी शिक्षक तसेच विविध शाळांतील विद्यार्थी पालक उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog