हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक  मोहरम .......

इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....


आज दिनांक 9 ऑगस्ट रोजी इंदापूर शहरात ४ ताबूत बसतात ,आणि सर्व विभागातील सवाऱ्याची (पंजे) संख्या ४०आहे .
  सर्व धर्मीय लोक त्यामधे एकत्र येतात .  सवाऱ्यांमध्ये हिंदू आणि मुस्लिम अशा सर्व जाती-धर्माचे लोकांच्या मानाच्या सवाऱ्या  आहेत .मोहरमच्या 
कत्ल ची रात म्हणजे ९वी ला सर्व सवाऱ्या गाव प्रदर्शनासाठी निघतात विशेषत सवारी निघण्याचा पहिला मान हा  ठाकर गल्लीचा आहे त्यानंतर  सातपुडा बागवान गल्ली कुरेशी मोहल्ला कसबा आणि शेवटी शेख मोहल्ला अशा विविध भागातून सवाऱ्या निघतात सवा- यांचे दर्शन घेण्यासाठी सर्व धर्मातील भाविक कांची एकच अलोट गर्दी   पहावयास मिळते. मानाच्या सवाऱ्या चे दर्शन घेण्यासाठी  शहरातील लोक वेगवेगळ्या मोहल्या मध्ये जमा होतात सवाऱ्यांची सांगता झाल्यानंतर संध्याकाळी आठ वाजता ताबूत निघतात  सातपुडा ,काजी गल्ली येथील मानाचा पहिला ताबूत नेहरू चौक येथे त्याचे आगमन झाले यावेळी नगरपालिकेकडून मुख्याधिकारी रामराजे कापरे सो . यांनी फुलांची चादर अर्पण करून स्वागत केले .यावेळी माजी नगराध्यक्ष श्री .पांडूरंग शिंदे  कमीटी सदस्य अॅड. इनायत काझी . जकीर काझी अॅड . अशपाक सय्यद सामाजिक कार्यकर्ते हमीदभाई आत्तार
प्रा . महादेव चव्हाण
सचिन जामदार
धीरज शहा .
अलताफ पठाण इ . उपस्थित होते .  इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री तय्यूब मुजावर साहेब आणि त्यांचा सहकारी स्टाफ यांनी फुलांची चादरअर्पण करून स्वागत केले   मोहरम कमिटीतर्फे नगरपलिकेचे मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याबद्दल मोहरम कमीटी तर्फ सत्कार करण्यात आला .  सातपुडा   ताबूत पुढे गेल्यानंतर शहरातील
प्रमुख मानाचे ताबूत शेख मोहल्ला आणि कसबा ताबूत यांची डावी उजवी म्हणजे दोन भावांची भेट नेहरू चौकात परंपरेनुसार होते तो अविस्मरणीय क्षण आपल्या डोळ्यात टिपण्या सारखा असतो तो पाहण्यासाठी महिला वर्ग व नागरिकांची मोठी गर्दी झालेली असते .
शहर मोहरम कमीटीतील सदस्य अबूल पठाण , फकिर पठाण .
शेप मोमीन ,
ईब्राहीमबाबा शेख
दादा इनामदार
मुनीर बेपारी
अजीज बागवान 
जाकीर पठाण
महादेव चव्हाण सर
हमीद भाई आत्तार यांचे हस्ते
प्रशासकिय अधिकारी यांचा सत्कार करून पुढे ही मिरवणुक बाजारपेठेतून जाताना भाविक हायदोस्त् दुल्हा  हुसेन यांचा जयघोष करत शिवाजी चौकात पोहचतात . तेथे धार्मिक विधी फातेहखानी होऊन दोन भाऊ विभक्त होतात व आपल्या भागामधे जाताना नुरे हसन बने अली दो चाहत कि सुलतान
अलविदा अलविदा
म्हणत  ताबूतांची सांगता होते .

Comments

Popular posts from this blog