(दयानंद त्रिंबके बार्शी प्रतिनिधि) १५ ऑगस्ट च्या पूर्व संध्येला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बार्शी नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक, विरमाता, वीरपत्नी यांचा सन्मान व सत्कार मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.त्याचप्रमाणे नगरपरिषदेच्या वतीने नगरपरिषद कर्मचारी भगिनींना तिरंगा ध्वज वाटप मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर ,मा. तहसीलदार सुनील शेरखाने व आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी मुख्याधिकारी सौ.अमिता दगडे पाटील,माजी नगराध्यक्ष ॲड.आसिफभाई तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
मोप ग्रामपंचायत चा अक्रोश पदयात्रेस पाठिंबा _वाशिम जिल्हा प्रतिनिधी उकंडी ढेंबरे_ _सरपंच ॲड.भागवत नरवाडे यांचे शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे अवाहन_ भूमिपुत्र शेतकरी संघटनांकडून 31 डिसेंबर ला रिसोड ते वाशिम शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पदयात्रा काढली जात आहे. या पद यात्रेस पाठींबा देण्यासाठी व सहभाग नोंदवण्यासाठी मोप येथिल सरपंच अॅड भागवत नरवाडे उपसरपंच काळे व इतर ग्रामपंचायत सदस्यांनी रिसोड स्थीत भुमीपुत्र कार्यालयात जाऊन भुमीपुत्र चे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांची भेट घेतली व अक्रोश पदयात्रेत सहभागी होत पाठिंबा दिला. भूमिपुत्र कडुन मोप ग्रामपंचायत व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजुपाटील डांगे, गजानन सदार, रामेश्वर सदार, रवि जाधव यांच्यासह भूमिपुत्र चे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment