अमृत आयुर्वेद चा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न......
इंदापूर तालुका प्रतिनिधी.... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.......
आयुर्वेदिक औषधे म्हणजे संजीवनी......
माजी. मंत्री हर्षवर्धन पाटील.....
दिनांक 15 ऑगस्ट 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर इंदापूर शहरांमध्ये अमृत आयुर्वेद शॉपचे उद्घाटन करण्यात आले . याप्रसंगी प्रमुख उपस्थिती भाजपा नेते मा. श्री हर्षवर्धन जी पाटील सोनाई परिवाराचे अध्यक्ष मा . श्री दशरथ दादा माने , पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा श्री प्रदीप दादा गारटकर भगवानराव भरणे सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मा . श्री मधुकर मामा भरणे पुणे जिल्हा बँकेचे संचालक मा. श्री आप्पासाहेब जगदाळे नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम शिवसेना शहराध्यक्ष मेजर सोमवंशी व इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष श्री पांडुरंग तात्या शिंदे श्री .अशोक बापू इजगुडे इत्यादी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले याप्रसंगी इंदापूर शहरातील पुरुष व महिला भगिनी उपस्थित होते.
याप्रसंगी श्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की श्री दत्तात्रय अनपट यांनी मागील 17 ते 18 वर्षापासून इंदापूर शहरात मोफत योग प्राणायामचे वर्ग घेत असून योग प्राणायाम बरोबरच दुर्मिळ आयुर्वेदिक औषधे इंदापूर तालुका व शहरवासीयांसाठी उपलब्ध केले ,याप्रसंगी पतंजली योग समितीचे अध्यक्ष श्री . मदन चव्हाण महिला पतंजली योग समितीच्या अध्यक्षा
सौ मायाताई विंचू ,किसान सेवा समितीचे अध्यक्ष, श्री .शहाजी बोराटे ,जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा सौ. कल्पनाताई भोर ,तसेच पतंजली योग समितीचे पुरुष व महिला साधक यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले. यावेळी श्री . राजाभाऊ सोनमाळी सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले ,तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती राजश्री शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री .विलास गाढवे यांनी मानले.
Comments
Post a Comment