पोलीस आयुक्त,हरीश बैजल सर यांनी मोरवंची येथील प्रार्थना बालग्राम व वृद्धाश्रम या निवासी प्रकल्पाला दिली भेट......
सोलापूर शहर प्रतिनिधी.. वैभव यादव,माय मराठी न्यूज चॅनल.....
सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून हरीश बैजल सर यांना खुपच कमी कार्यकाळ मिळाला,खरंतर हे आमच्यासारख्या सामाजिक संस्थांच दुर्भाग्यच पण सरांची नेमणूक झाल्यापासून सोलापूर मधील बऱ्याच संस्थांना त्यांनी मार्गदर्शन व मदतीचा हात दिला.
कित्येकदा सरांनी स्वतः फोन करून प्रकल्पच काम कस चालू आहे या संदर्भात विचारणा केली, मग बोलताबोलता एखादी अडचण सांगितली की ती अडचण लगेच दूर व्हायची.
मागच्या आठवड्यात सर प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले होते.प्रकल्पातील मुले व आजीआजोबा यांच्याशी सरांनी गप्पा मारल्या.प्रत्येकाच दुःख आपुलकीनं ऐकलं सरांसोबत बाप्पा मारताना आजीआजोबा भावुक झाले होते.
सरांनी प्रकल्पाला शैक्षणिक साहित्य,खेळणी,पुस्तके भेट दिली. संस्थेची आर्थिक अडचण लक्षात घेता सरांनी आर्थिक मदत ही केली त्याच बरोबर दोन iPhone ही भेट म्हणून दिले.
सरांची भेट ही आमच्यासाठी प्रेरणा देणारी होती.सरांची आठवण म्हणून प्रकल्पावर त्यांच्या नावाने त्यांच्या होते एक झाड लावण्यात आलं.प्रार्थना परिवाराकडून एक छोटीशी आठवण म्हणून माझे मित्र चित्रकार महेश मस्के यांनी पिंपळाच्या पानावर रेखाटलेल सारंच चित्र भेट म्हणून दिल.
सर तुमचा सहवास जरी काम लाभला असला तरी तो ऊर्जा देणारा होता.तुम्ही जरी सोलापूर मध्ये नसलात तरी पण तुमचं मार्गदर्शन कायमस्वरूपी लाभेल यात कोणतीच शंका नाही.
धन्यवाद!
Comments
Post a Comment