स्वर्गीय . माननीय. आमदार . विनायकराव मेटे साहेबांना आदरांजली वाहण्यासाठी खास श्रद्धांजली सभांचे आयोजन भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. मेटे साहेबांना रिसोड, मालेगांव आणि वाशिम भागा मध्ये मानणारा मोठा वर्ग आहे. मेटे साहेबांच्या अकाली निधनामुळे या परिसरातील त्यांच्या चाहत्यावर शोककळा पसरललेली आहे. दि. 25 आॅगष्ट रोज गुरुवार ला रिसोड येथे श्री शिवाजी हायस्कूल सभागृहात सकाळी साडे दहा वाजता सामुदायिक श्रध्दाजंली व पसायदान होईल. मालेगांव येथे पंचायत समितीमधील सभागृहात दुपारी एक वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाशीम येथे सांयकाळी साडेचार वाजता भूमिपुत्र शेतकरी संघटना कार्यालयात, शिवनेरी बिल्डिंग, अकोला नाका येथे प्रार्थना सभांचे आयोजन भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. स्व.मेटे साहेबांवर प्रेम करणानार्या सर्व पक्षातील, सर्व गटातटातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. श्रद्धांजली सभा वेळेवर होईल. सभेच्या ठिकाणी कुणाचेही भाषण होणार नाही. मुक श्रद्धांजली व पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता होणार आसल्याचे आयोजका कडुन कळविण्यात आले आहे.
उकंडी ढेंबरे / वाशिम प्रतिनिधी
Comments
Post a Comment