जय इन्स्टीट्युट ऑफ नर्सिंगमधील कोराना योध्द्यांचे पतंजलिकडुन कौतुक.......
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....


   पतंजलि योग समिती इंदापूर च्या पदाधिकार्‍यांनी जय नर्सिंगमध्ये प्रशिक्षणार्थी  विद्यार्थी आणि स्टाफ यांची भेट घेऊन त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचे कौतुक करीत अभिनंदन केले.

     कोरोना लाॅकडाऊनमध्ये  संसर्गाला घाबरून लोक घरात बसत होते त्या काळात या संस्थेत   शिकत असणार्‍या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले, कोरोना ने आजारी पेशंटची सेवा केली ,काळजी घेतली. स्वतःचा जीव धोक्यात घालुन लोकांचे प्राण वाचवण्याचे काम केल्याची  माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री.जयवंत नायकुडे यांनी सांगितली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त  योग समितीतर्फे या प्रशिक्षणार्थींना गोड स्नेहभोजन देत समाजाप्रती  जपलेल्या बांधिलकीबद्दल पतंजलीचे मार्गदर्शक हमिद भाई आतार यांनी आभार मानले..
   यावेळी  संस्थेच्या संचालिका  सौ.लता नायकुडे ,सामाजीक कार्यकर्ते पतंजलि योग परीवाराचे मार्गदर्शक हमीदभाई आतार , मल्हारी घाडगे, चंद्रकांत देवकर,रविंद्र परबत,किसन पवार,सायरा भाभी आतार, मेघा भंडारी,रेखा भंडारी इत्यादी सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog