राजवर्धन पाटील यांच्या हस्ते भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे सरचिटणीस अब्दुलगणी अजिज शेख यांचा सत्कार.......
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चच्या सरचिटणीसपदी बावडा गावाचे अब्दुलगणी अजिज शेख यांची निवड झाली आहे.भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी अब्दुलगणी अजिज शेख यांना या निवडीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भाजप तालुकाध्यक्ष शरद जामदार , बावडा गावाचे सरपंच किरण पाटील,पवन घोगरे , तेजस देवकाते , कुबेर पवार ,सचिन सावंत आदी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
अल्पसंख्यांक समाजासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना प्रभावीपणे राबविणार असल्याचे यावेळी नूतन सरचिटणीस अब्दुलगणी अजिज शेख यांनी सांगितले.
Comments
Post a Comment