इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा राजवर्धन पाटील यांनी केला सत्कार*
इंदापूर तालुक्याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना 1 ऑगस्ट रोजी महसूल दिनाचे औचित्य साधत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे. आज भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निराभिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी तहसीलकचेरी इंदापूर येथे तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, त्यांचा सन्मान केला. यावेळी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे उपस्थित होते .
राजवर्धन पाटील म्हणाले की, ' तहसीलदार श्रीकांत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तहसीलदार श्रीकांत पाटील यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून झालेला सन्मान हा इंदापूर तालुक्यासाठी मोठा बहुमान आहे...
Comments
Post a Comment