हर घर तिरंगा
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारत सरकारच्या सूचनेप्रमाणे देशातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकवायचा असे सांगण्यात आले हर घर तिरंगाची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केली होती. देशामध्ये देश प्रेमाची जाणीव ही प्रत्येकाच्या मनामध्ये यावेळी दिसून आली याचाच एक भाग ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांच्या मनातून त्यांच्या निरागस चेहऱ्यातून दिसून आला. इंदापूर तालुक्यातील श्री हनुमान विद्यालय अवसरी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी यांना आपल्या घरावर प्रत्येकाने ध्वज फडकवायचा सूचना देण्यात आली या सूचनेचे पालन करून विद्यार्थ्यांनी प्रत्येकाच्या घरावर हर घर तिरंगा हे स्वप्न साकार केले त्यांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज मानाने फडकवण्यात आला.
ध्वजाचा सन्मान करून भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.
Comments
Post a Comment