माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  डाळज सोसायटी व हनुमान सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हॉईस चेअरमन व संचालक यांचा केला सत्कार.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी... ‌धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....

    डाळज कार्यकारी सेवा सोसायटी व हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटी डाळज या दोन्ही संस्थांची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. सदर निवडणूक डी एन काका जगताप व डाळज नंबर १,२,३ चे विद्यमान सरपंच  विकास (आप्पा )कुंभार व दादासो गलांडे सतीश हगारे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक पार पडली असून सदर निवडणुकीमध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला असून डाळज विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन पदी रामदास जगताप व व्हॉईस चेअरमन पदी सुमन वाकळे यांची बिनविरोध निवड झाली तर हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी  राजेंद्र गलांडे व्हॉईस चेअरमन पदी दत्तात्रय पवार यांची यांची बिनविरोध निवड झाली व सर्व संचालक मंडळाने माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.त्यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित सर्व नवनिर्वाचित चेअरमन व्हाइस चेअरमन व संचालक यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळांनी दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथून पुढील कारभार चालवू असे म्हटले.

Comments

Popular posts from this blog

अन प्रार्थना फाउंडेशन मधील वंचित मुलांसाठी सुरू झाले फिरते वाचनालय.....