इंदापूर तालुक्यात विकासाचे नवे पर्व सुरु.....
हर्षवर्धन पाटील
जनतेच्या मनातील सरकार सत्तेवर
निरवांगी येथे नंदिकेश्वराचे घेतले दर्शन
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....
इंदापूर तालुक्यातील विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी भाजप-शिवसेना सरकार कडून दिला जाईल. आता जनतेच्या मनातील सरकार राज्यात सत्तेवर आले आहे, त्यामुळे इंदापूर तालुक्यात सर्वांगीण विकासाचे नवे पूर्व सुरू होत आहे, असे गौरवद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.8) काढले.
निरवांगी येथील प्राचिनकालीन प्रसिद्ध श्र नंदिकेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील यांनी पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंही भेटून 50 हजार रुपये अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांना यापूर्वीच्या सरकारने घातलेल्या जाचक अटी ह्या नवीन जीआर काढून दूर केल्या आहेत. त्यामुळे राज्यातील 14 लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. गेल्या अडीच वर्षात तालुक्यात एकही नवीन उद्योग धंदा आला नाही, एकाही युवकांना रोजगार मिळाला नाही, एकही नवीन संस्था उभारणी झाली नाही किंवा एकही नावीन्यपूर्ण काम झाले नाही. रस्त्याची जी विकास कामे झाली त्याचा दर्जा तुम्हाला माहित आहे. शासनाच्या आलेल्या निधीचा योग्य विनियोग करावयाचा असतो, पण तसे काम इंदापूर तालुक्यात झाले नाही, असे भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
इंदापूर तालुक्यातील गावागावातून विकास कामांची प्रस्ताव शासनाकडे पाठवून निधी दिला जाईल. निरवांगी, दगडवाडी साठी निधी कमी पडू देणार नाही. आठ दिवसांपूर्वी जलसंपदा अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन नीरा नदीवर बंधारे दुरुस्ती, बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी अडविणे या संदर्भात 3 तास चर्चा झाली असून शेतकऱ्यांना पाणी कमी पडू दिले जाणार नाही. मी सत्तेवर असताना 22 गावांसाठी 7 नंबर फॉर्मवर पाणी दिले आहे, तसेच सणसर कट पुनर्जीवित करावा लागेल, असे त्यानी भाषणात स्पष्ट केले. सर्व जनतेला सुखी समाधानी राहू दे, असे साकडे नंदिकेश्वर चरणी घातल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यावेळी नाना पोळ, महादेव कवितके यांची भाषणे झाली. कार्यक्रमास परिसरातील गावा-गावातील पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :-
आता जनतेवर अन्याय होणार नाही
हर्षवर्धन पाटील
आपण सत्तेवर असताना 20 वर्षात कधीही कोणावर अन्याय केला नाही. मात्र इंदापूर तालुक्यात गेल्या अडीच वर्षात गावागावातील जनतेवर, कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या माध्यमातून अन्याय झाला आहे. राज्यात आपले भाजप-शिवसेना सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे आता कोणावरही अन्याय होणार नाही, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
फोटो :- निरवांगी (ता. इंदापूर) श्री नंदिकेश्वर मंदिरात हर्षवर्धन पाटील यांनी पूजा करून दर्शन घेतले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन पाटील.
Comments
Post a Comment