माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा कार्याध्यक्ष   पदी निवड.......
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....

   माळी समाजासाठी आत्तापर्यंत केलेल्या कामाची पोच पावती माळी सेवा संघाचे अध्यक्ष दत्ताभाऊ माळी तसेच माळी सेवा संघाचे आधारस्तंभ रूपालीताई चाकणकर  यांनी इंदापूरचे माळी समाजाचे तरुण तडफदार युवक विजुभाऊ शिंदे यांची पुणे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड केली आहे.
     माळी समाजातील निर्माण होणाऱ्या विविध अडचणी दूर करण्यासाठी सतत धडपड करणारे तसेच समाज संघटन करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो, सामाजिक क्षेत्रात चांगले काम तसेच संत सावता माळी पुण्यतिथी निमित्त विठ्ठलवाडी येथे संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोणाच्या काळामध्ये अन्नधान्य वाटप करण्यात आले होते, तसेच श्री गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे उपक्रम नेहमीच राबवले जातात म्हणूनच माळी सेवा संघ पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी माझी निवड करण्यात आली असे विजुभाऊ शिंदे यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog