श्री महारुद्र परजणे यांचा राष्ट्रपती शौर्यपदक पुरस्कार मिळाले बद्दल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, इंदिरानगर वैराग येथे सत्कार संपन्न
       वैराग पोलीस ठाणे वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री परजणे साहेब यांना राष्ट्रपती शौर्यपदक मिळाले बद्दल सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मा. श्री खंडेराया घोडके सर यांच्या हस्ते मानाचा फेटा,शाल,श्रीफळ व हार घालून सत्कार करण्यात आला.तसेच पोलीस कॉन्स्टेबल श्री मुंडे साहेब यांचाही सत्कार प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य श्री खंडेराया घोडके यांनी प्रास्ताविक पर भाषण करून त्यांचे स्वागत केले तर श्री परजणे साहेब यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांचा पोलीस खात्यातील प्रवास या ठिकाणी कथन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाळके सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विकास पाटील सर यांनी केले कार्यक्रमास सर्जापूरचे माजी सरपंच श्री आनंद कोरके, आरपीआय अध्यक्ष श्री दत्ता क्षीरसागर आणि बाळासाहेब पवार हे तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog