इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष गोकुळ दास शहा यांचे निधन........
इंदापूर तालुका प्रतिनिधी.. धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.......
इंदापूर येथील प्रसिद्ध व्यापारी थोर समाजसेवक, निस्वार्थ कर्मयोगी, अजातशत्रू, गोकुळदास विठ्ठलदास शहा यांचेइंदापूर येथील प्रसिद्ध व्यापारी थोर समाजसेवक, निस्वार्थ कर्मयोगी, अजातशत्रू, गोकुळदास विठ्ठलदास शहा यांचे आज शनिवारी दि.१० सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले.ते ८७ वर्षांचे होते.
भाई म्हणून ते सर्वत्र परिचित होते. गोकुळदासभाई शहा यांच्या निधनामुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
इंदापूर तालुक्यात स्वर्गीय शंकराव बाजीराव पाटील यांच्यासोबत कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. इंदापूर शहरातील प्रसिद्ध अशा शहा ब्रदर्स या कापड दुकानाचे हे मालक होते.
घरातच राजकीय व सामाजिक वारसा लाभल्याने त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पुढील पिढीने ही त्यांचा वारसा जपला आहे, सुनबाई अंकिता शहा या इंदापूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून काम करत आहेत, त्यांचे सुपुत्र मुकुंद शहा हे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आहेत तर पुतणे भरत शहा हे सध्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन म्हणून काम करत आहेत.
गेल्या महिनाभरापूर्वीच गोकुळदास शहा यांच्या पत्नी शकुंतला शहा यांचे दुःखद निधन झाले होते, शहा कुटुंब दुःखातून सावरतेच तोच दुसऱ्या दुःखद घटनेने शहा कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भाई यांच्या पाश्चात मुले, मुलगी, सुना,पुतणे,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
Comments
Post a Comment