लंपी आजाराबाबत योग्य ती खबरदारी घ्या.....
माजी पशुसंवर्धन राज्यमंत्री, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रशासनाला सूचना

इंदापूर तालुका प्रतिनिधी.....
धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....

   इंदापूर तालुक्यामध्ये गाय वर्ग व म्हैस वर्ग जनावरांची संख्या जवळपास 1लाख 70 हजार 465 इतकी आहे तालुक्यामध्ये लंपी व्हायरस हा आजार आल्याने आपल्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत लंपी आजाराच्या 99 केसेस आढळलेले आहेत त्यापैकी आतापर्यंत 51 केसेस ह्या पूर्णपणे बरे झालेले आहेत सद्यस्थितीमध्ये 43 केसेस ऍक्टिव्ह आहेत आतापर्यंत पाच जनावरांचा मृत्यू झालेला आहे या मध्ये मोठ्या मृत जनावरांना 35 हजार रुपये इतके तर लहान जनावरांना 16 हजार रुपये रक्कम शासनामार्फत नुकसान भरपाई म्हणून देणार आहे.
अशी माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या आजाराबाबत लोकांमध्ये गैरसमज पसरू नये तसेच आजाराबाबतची योग्य खबरदारी माहिती तसेच प्रत्येक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे म्ह्णून स्वतः पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन भेट द्यावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
आतापर्यंत तालुक्यामध्ये 27 दवाखाने मार्फत काम चालू आहे 16 इ पी सेंटर आहेत तसेच आजपर्यंत 40 हजार लसींचे डोस प्राप्त झाले होते त्याचेही लसीकरण पूर्ण झालेले आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांना फोन करून उद्याच जिल्हा परिषदेच्या वतीने 50 हजार लसींचे डोस देण्याची व्यवस्था होईल असे आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले....इंदापूर तालुक्यामध्ये प्रामुख्याने शहाजीनगर भागात या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला आढळला आहे याठिकाणी जवळपास 21 जनावरे लंपी आजाराने बाधित झालेली असल्याची माहिती दिली
 याचबरोबर कळस,कळंब, लासुरणे,उद्धट,कुंभारगाव,डाळज,भिगवण,निरगुडे, सणसर या गावांमध्ये लंपी आजार झालेली जनावरे आढळून आली आहेत या भागातील पशुपालकांनी जनावरांच्या अंगावर पुरळे येणे, ताप येणे, नाकातून स्त्राव येणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार भरणे यांनी केले तसेच याबाबत योग्य उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत तसेच 17 व 18 सप्टेंबर रोजी तालुक्यामध्ये निर्जंतुकीकरण तसेच डास किडे मारण्याकरिता फवारणी करणार आहेत 
यावेळी इंदापूर चे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट  तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ राम शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog