आदर्श शिक्षक पुरस्काराने येणार गौरवण्यात.........
अवसरी हायस्कूलच्या यशामध्ये पुन्हा मानाचा टोप
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल......
पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला. यामध्ये इंदापूर तालुक्यातील श्री हनुमान विद्यालय अवसरी मधील शिक्षिका सौ, अरुणा सर्जेराव कवडे मॅडम यांना जाहीर झाला आहे. इंग्रजी गणित विषयाचे यशस्वीअध्यापन करत असताना तसेच सांस्कृतिक कार्याची आवड यामध्ये शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यामध्ये महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते तसेच अध्यापन क्षेत्रामध्ये संवाद कौशल्य व यूट्यूब च्या माध्यमातून मुलांना नवनवीन माहिती देणे असा हा त्यांचा उपक्रम लक्षात घेऊनच पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांना दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पुणे येथील पद्मावती नगर अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये त्यांचा सन्मान मुख्याध्यापक संघाच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण वसंत लोंढे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment