ग्रामपंचायतिकडून बसण्याची आसनाची व्यवस्था व फिल्टर च्या पाण्याची सुविधा उपलब्ध.
निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथील ग्रामपंचायतीकडून जागोजागी, बस थांबा, थंड झाडाच्या खाली, व मंदिराच्या शेजारी गावातील नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था ग्रामपंचायतीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना सायंकाळी गप्पा मारण्यासाठी व विरंगुळा म्हणून वयोवृद्ध व्यक्ती आनंद घेत आहेत.
तसेच  दोन वर्ष झाले संपूर्ण कासार बालकुंदा व सरदारवाडी गावाला शुद्ध फिल्टरचे पाणीपुरवठा मोफत दिले जात आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत असल्याने नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog