निलंगा तालुक्यातील कासार शिरशी ते बसवकल्याण जाणाऱ्या नेलवाड ते औंढा पाटी रस्त्याची खोदकाम केल्यामुळे दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरती सतत वाहनाची वर्दळ असते. या रस्त्याशिवाय बसवकल्याण व कासार शिरशी बाजारपेठाला जाणे शक्य नाही. परंतु येथील रस्ता खोदकाम केल्यामुळे वाहने चिखलात फसत आहेत. या रस्त्यामुळे आतापर्यंत सात ते आठ लोकांचे गाडीवरून पडून अपघात झाले आहेत. संबंधित प्रशासनाने याकडे जराही लक्ष देत नसल्याचे बाब उघड झाले आहे.
छोटी वाहने, कार, यांना मोठी कसरत करत रस्त्यावरून जावे लागत आहे. या रस्त्यावर एखाद्या व्यक्तीचा बळी गेल्यासच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हा रस्ता तात्काळ पूर्ण करून सुरळीत करावी अशी मागणी परिसरातील गावातील नागरिकाकडून केले जात आहे.
Comments
Post a Comment