नीरा भीमा कारखान्याचे 1 लाख मे. टन गाळप पूर्ण ....
इंदापूर प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....
दि.14/11/22
शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2022-23 च्या 22 व्या गळीत हंगामामध्ये 1 लाख मे. टन ऊसाचे गाळप रविवारी (दि.13) पुर्ण केले.
कारखान्याचा चालू गळीत हंगाम उत्कृष्टपणे चालू असून प्रतिदिनी 5400 ते 5500 मे. टन क्षमतेने ऊसाचे गाळप केले जात आहे. तसेच कारखान्याचे सहवीज निर्मित, इथेनॉल आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण क्षमतेने चालु आहेत.
कारखान्याने ऊस गाळपाचा 1 लाख मे. टनाचा टप्पा अल्पावधीत पार केलेबद्दल ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार व मजूर, अधिकारी-कर्मचारी तसेच हितचिंतक यांचे कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतिलाल झगडे, कार्यकारी संचालक राम पाटील व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे..
Comments
Post a Comment