राहीबाई थोरात कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन......
इंदापूर तालुका प्रतिनिधी.... ‌धनश्री गवळी....

आज दिनांक १२/११/२०२२ रोजी भिगवण येथे शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व सौ. राहीबाई थोरात सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. राहीबाई थोरात कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
   कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्मा ताई भोसले यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. ट्रस्ट च्या अध्यक्षा श्रीमती पद्मा ताई भोसले व राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. श्री. बापूराव थोरात यांच्या मार्गदर्शनाने व ट्रस्टचे सचिव मा. डॉ. गिरीश देसाई सर, 
 यांच्या संकल्पनेतून भिगवण व परिसरातील ग्रामीण भागातील महिला , मुली व विद्यार्थ्यांना हेअर, ब्युटी, शिवणकाम, फॅशन डिझायनिंग या क्षेत्रातील उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळावे या साठी सदर कौशल्य प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. 
“ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आम्ही प्रशिक्षण केंद्र सुरु करत आहेत” असे सौ. राहीबाई थोरात सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई बापूराव थोरात म्हणाल्या. ”पुणे सारख्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणे ग्रामीण भागातील विद्यार्थी , महिला यांना परवडणारे नाही, म्हणून आपल्या भागातच पुणे सारखे उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून संस्थेची स्थापना केली आहे.” आणि हेच आमचे ध्येय आहे असे श्री. बापूराव थोरात यांनी म्हणले. ”विद्यार्थी व विद्यार्थीनीना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे भवितव्य उज्वल करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण चे महत्व या बद्दल ट्रस्ट चे विश्वस्त श्री. अरविंद गारटकर सर यांनी मार्गदर्शन केले. ”इंदापूर मध्ये 5000 पेक्षा जास्त महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यात येत आहे त्याच प्रकारे भिगवण व परिसरातील महिलांसाठी संस्था सर्वोतोपरी प्रयत्न करील” असे ट्रस्ट च्या अध्यक्षा पद्मा ताई भोसले म्हणाल्या. जावेद हबीब अकॅडेमी इंदापूरचे प्रमुख अमोल राउत सर यांनी विद्यार्थ्यांना हेअर, ब्युटी व फॅशन डिझायनिंग बद्दल मार्गदर्शन केले. 
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. कृष्णा मोहिते यांनी केले. सूत्र संचालन कावेरी नायब यांनी केले.  
कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सभापती  श्रीमती. प्रमिला ताई जाधव, माजी सभापती श्री. नागेश खटकाळे, सौ. नीलिमा भोगावत, सौ. सोनाली वाकसे, सौ. सुनिता थोरात, सौ. पूजा थोरात, सौ. वंदना थोरात, श्री. नंदकिशोर थोरात, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र चे प्रमुख श्री. महादेव चव्हाण सर, सामजिक कार्यकर्ते श्री. हमीद आतार, कर्मयोगी शंकरराव पाटील साखर शाळे चे समन्वयक श्री. भारत बोराटे सर, संजय शेलार, ट्रस्ट चे इन्चार्ज दिपक जगताप, जावेद हबीब  अकॅडेमी चे रोहित साळुंके, आरती घोडके, प्रीती खरात, अमृता भोंग, अमर काळे, गायत्री झगडे उपस्थित होते. तसेच दैनिक जनप्रवास चे पत्रकार  शिवाजी आप्पा पवार, विश्व २४ न्यूज चे पत्रकार 
सोनकांबळे उपस्थित होते , कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. अजय बापूराव थोरात यांनी केले.

Comments

Popular posts from this blog