उध्दव ठाकरे शिवसेनेची रविवारी बार्शीत संघटनात्मक बैठक
वैराग दि प्रतिनिधी : बार्शी तालुक्याची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण काकडे यांनी बार्शी  येथील शासकीय विश्रामगृहामध्ये रविवारी सकाळी अकरा वाजता तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे.शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर त्याचा परिणाम जसा राज्यावर झाला तसा काहीसा परिणाम बार्शी तालुक्यावर ही झाला आहे त्यामुळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण काकडे यांना मातोश्री वरून बोलावणे आले होते. दरम्यान तालुक्याच्या सक्षम संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख प्रवीण काकडे यांनी बार्शी मध्ये पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक बोलावली असून संघटनात्मक बांधणी बाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog