उपसरपंच पदी सौ संगीता शिंदे यांची बिनविरोध निवड.....
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल.....
अवसरी बिडशिंगे येथील ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ संगीता आदित्य शिंदे यांची बहुमताने निवड करण्यात आली
इंदापूर तालुक्यामधील अवसरी बेडशिंगे येथील ग्रुप ग्रामपंचायत मधील उपसरपंच पदाचा कार्यकाल पूर्ण करून श्री चंद्रकांत कवीतके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. या उपसरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी ग्रामपंचायत सदस्या सौ संगीता आदित्य शिंदे यांची एक मताने ग्रामपंचायत कार्यालय अवसरी येथे ग्रामपंचायत चे सर्व सदस्यांच्या उपस्थित बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत सरपंच श्री संदेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अवसरी च्या ग्रामसेविका रूपाली व्यवहारे यांनी निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
नवनियुक्त उपसरपंच यांनी आपल्या सत्कार समारंभ प्रसंगी असे सांगितले की ग्रुप ग्रामपंचायत मधील सर्व विकासाची कामे मी जनतेला विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे काम करेल असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री शांतिलाल शिंदे पाटील तसेच, तलाठी भाऊसाहेब अजित पाटील, पत्रकार अगंद तावरे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जगताप, चंद्रकांत कवितके, पांडुरंग कांबळे, ऋतुजा मोरे, सुनंदा कदम, मनीषा उंबरे, नितीन यादव, ग्रामस्थ रवींद्र काटे, निवृत्ती मगर, नागनाथ शिंदे, गणेश तिकोटे, नितीन कांबळे, तसेच इतर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment