इंदापूर शहरात कै अजित देविदास ढवळे पवार यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आ. दत्तात्रय भरणे यांनी केले  विविध कामाचे लोकार्पण. .....
इंदापूर तालुका प्रतिनिधी... धनश्री गवळी माय मराठी न्यूज चॅनल....


    कै.अजित देविदास ढवळे - पवार यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या शुभहस्ते इंदापूर शहरातील श्रीराम चौक ते ब्रिज पर्यंत वृक्षारोपण व सुशोभीकरण तसेच शिवाजीनगर येथील दत्त मंदिर समोर पेव्हर ब्लॉक बसविणे. श्रीराम चौक येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बेंच लोकार्पण सोहळा. शिवाजीनगर,  राजीवलीनगर , शाहूनगर , मार्केट तालीम येथे बेंच बसविणे तसेच श्रावण बाळ अनाथ आश्रम येथील मुलांना थंडीपासून संरक्षणासाठी जर्किन चे वाटप यावेळी करण्यात आले.           
या कार्यक्रमाचे आयोजक इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे - पवार व अजित फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी इंदापूर शहरातील नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.        
 यावेळी आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले की, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे हे नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. त्यांनी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविला आहे. कै. अजित ढवळे यांच्या अपघाती निधनाने एक ढवळे कुटुंबातील तरुण मुलगा गमावल्याने ढवळे कुटुंब तसेच इंदापूर शहरातील सर्व नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अजित हा अत्यंत होतकरू आणि हुशार तरुण सहकारी होता त्याचाच पावलावर पाऊल ठेवून बाळासाहेब यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवणे, वृक्ष लागवड करणे, सुशोभीकरण करणे व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून बेंच  आधी गोष्टींसाठी स्वखर्चातून या कामासाठी हातभार लावलेला आहे.         यावेळी इंदापूर शहरातील प्रत्येक वार्डमध्ये सर्वांगीण विकास करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम असून इंदापूर शहराचा कायापालट तसेच चौका चौकात सुशोभीकरण करण्याचे काम आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून झाले आहे असे प्रदीप गारटकर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog