नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन.......
इंदापूर तालुका प्रतिनिधी.... धनश्री गवळी माय मराठी न्यूज....
इंदापूर येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन....
नारायणदास रामदास पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सौजन्याने पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेने ड्रिप माईंड स्पेस अकॅडमी यांच्यावतीने प्रथमच इंदापूर शहरात बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, १३ नोव्हेंबर रोजी स्पर्धेची पहिली फेरी १०.३०वाजता शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे संपन्न होणार आहे.
या स्पर्धेमध्ये खुला गट प्रथम क्रमांक दहा हजार व चषक द्वितीय क्रमांक ५ हजार व चषक तृतीय क्रमांक ३ हजार व चषक तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहेत.
पंधरा वर्षाखालील व दहा वर्षाखालील गटांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये सर्वोत्कृष्ट महिला, सर्वोत्कृष्ट वयस्कर, सर्वोत्कृष्ट अकॅडमी, सर्वोत्कृष्ट शाळा, सर्वोत्कृष्ट लहान अशी विशिष्ट पारितोषिक यांचेही आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये खुल्या गटासाठी ४०० रुपये व १५ वर्षाखालील गटासाठी ३०० रुपये ठेवण्यात आली आहे.
यावेळी 87 93 29 42 95 दिनकर कांबळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment